दिवंगत डॉ. अरशद चाऊस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): दिवंगत डॉ. अरशद  चाऊस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. डॉ. जुबेर चाऊस व मित्र मंडळाच्या वतीने त्र आयोजित या रक्तदान शिबिरात ८० ते ९० युवकांनी गे रक्तदान करून समाजाप्रती जबाबदारी पार पाडली. या शिबिराचे उद्घाटन जमाते अमीर मौलाना मोबीन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास गायकवाड, फैसल नाहादी, डॉ. जुबेर चाऊस, माजी नगरसेवक बदर जहुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराला गंगापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक पाटील, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, मौलाना सय्यद युसुफ, नगरसेवक सय्यद अख्तर, माजी नगरसेवक नईम मंसुरी, अनिस बाबा कुरेशी, विशाल गायकवाड, राहुल वानखेडे, जुबेर नाहादी, गुड्डू चाऊस, फैसल बासोलान, यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. या शिबिरात डॉ. नीता शेजुळ, डॉ. नितीन लोखंडे, डॉ. इब्राहिम शेख, डॉ. प्रेम रणवीर, डॉ. अंजली धोटे, डॉ. विशाल बाईनवाड, डॉ. रक्षदा मेहरिन, डॉ. दीपाली परघने, शोलमन बत्तीसे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी इम्रान चाऊस, जफर खान, सरवर जहुरी, अबूद बाकोदा, जमीर शेख, अनिस शेख, साजेद शेख, मोबिन शेख, जुबेर सिद्दीकी, रईस पटेल, आमेर जहुरी, जाहेद शेख, बाबा बुरान, रेहान सय्यद, नाजेर जहागीरदार यांनी केले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात जनजागृती होऊन रक्तदानाची चळवळ अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.